मुंबई

मेट्रो ९ चा दहिसर (पूर्व) – काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत येणार

दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानच्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भायंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या गुरुवारी रात्री प्रस्थापित करण्यात आला. यामुळे मेट्रो ९ चा दहिसर (पूर्व) – काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यानच्या मुंबई मेट्रो मार्ग क्रमांक ९ प्रकल्पाने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भायंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या गुरुवारी रात्री प्रस्थापित करण्यात आला. यामुळे मेट्रो ९ चा दहिसर (पूर्व) – काशिगाव पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सेवेत येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

एमएमआरडीएच्या ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा आहे. सध्या या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या अंतर्गत, भायंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले.

या प्रकल्पाची लांबी १०.५४ किमी असून यावर ८ उन्नत स्थानके आहेत. या प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दहिसर (पूर्व) ते काशिगाव हा पहिला टप्पा डिसेंबर २०२५ मध्ये प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तर काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस चौक हा दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ मध्ये प्रवासी सेवेत येणार आहे.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य