मुंबई

Mumbai : माझगाव परिसरात मध्यरात्री गोळीबार ; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

या गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील माझगाव परिसरात मध्यरात्री ३ वाजेच्या सु्मारास हा गोळीबार झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. गोळीबाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. या गोळीबाराचं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माझगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अफजल रेस्टॉरंट परिसरात अज्ञातांनी गोळीबार केला आहे. दहशत पसरवण्यसाठी हा गोळीबार केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली असून ही गोळी टाळण्यासाठी धावत असलेल्या व्यक्तीला दुखापत झाली. त्याला गोळी लागली नसून धावताना दगड लागल्याने दुखापत झाली. जखमी झालेल्या व्यक्तीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला. पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल क रुन घेतला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०७ आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भायकळा आणि इतर परिसरातील पोलिस या घटनेतील आरोपीला शोधण्यासाठी पथके तयार करत आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश