Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल (Photo-X)
मुंबई

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

सुरुवातीला आगीचे स्वरूप तुलनेने किरकोळ होते. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि इमारतीच्या काही भागात ती वेगाने पसरली.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुलुंड पूर्वेतील नवघर परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रकल्पातील कामगारांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या शेडला गुरुवारी (दि. ८) भीषण आग लागली. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर एकापाठोपाठ तब्बल सात गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, परिसरातील सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

कामगारांच्या शेडला अचानक आग

मुलुंड पूर्वेतील नवघर येथे प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी बीएमसीकडून बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाच्या परिसरात कामगारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तळमजला अधिक एक मजला असलेल्या या कामगार वसाहतीला गुरुवारी अचानक आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरूप तुलनेने किरकोळ होते. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि इमारतीच्या काही भागात ती वेगाने पसरली.

एकापाठोपाठ ७ सिलिंडरचे स्फोट

आग पसरत असतानाच कामगारांच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एकूण सात गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. स्फोटांच्या आवाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे दाट लोट दूरवरूनही दिसत होते.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परिसरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली.

सर्व कामगार सुरक्षित

आग लागल्यानंतर परिसरात उपस्थित असलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची किंवा कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

धारावीतील प्रकल्पबाधितांसाठी वसाहत

मुलुंड पूर्वेतील नवघर परिसरात प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी बीएमसीकडून पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू आहे. धारावीतील प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांसाठी या परिसरात पुनर्वसन वसाहत उभारण्यात येत असल्याची माहिती आहे. याच बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात कामगारांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

गॅस सिलिंडरच्या स्फोटांमुळे आग आणखी भडकली की सिलिंडरच्या स्फोटांपूर्वीच आग लागली होती, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आगीचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे. घटनेबाबत अधिकृत तपासानंतरच आगीमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले असून, त्यामध्ये इमारतीतून मोठ्या प्रमाणात धूर निघताना आणि आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

Thane : जांभळी नाक्यावर अतिक्रमणांचा भडका; महावितरणच्या डीपीभोवतीच बांधकामाचा विळखा