Mumbai : मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडी फुटणार; मुलुंड म्हाडा कॉलनी ते हरि ओमनगरपर्यंत जोडरस्ता प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : मुलुंड पूर्वेकडील वाहतूककोंडी फुटणार; मुलुंड म्हाडा कॉलनी ते हरि ओमनगरपर्यंत जोडरस्ता

मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी आणि हरि ओमनगर यांच्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या दोन्ही परिसरांना जोडणारा १८.३० मीटर रुंद आणि ६५० मीटर लांबीचा विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिका २५ कोटी ७२ लाख रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी आणि हरि ओमनगर यांच्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या दोन्ही परिसरांना जोडणारा १८.३० मीटर रुंद आणि ६५० मीटर लांबीचा विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिका २५ कोटी ७२ लाख रुपये खर्च करणार आहे.

सध्या मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी आणि हरि ओमनगर यांच्यातील वाहतूक संपर्क अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या नाल्यावरील पुलाच्या प्रस्तावासोबत सुरुवातीला केवळ २० मीटर जोडरस्त्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणी आणि विकास आराखड्याचा अभ्यास केल्यानंतर हरि ओमनगरपर्यंत संपूर्ण रुंदीचा जोडरस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रस्त्याची लांबी वाढवून ६५० मीटर करण्यात आली. या प्रकल्पासाठी टंडन अर्बन सोल्युशन्स आणि टेक्नोजेम कन्सल्टंट्सची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ­

स्थायी समितीपुढे प्रस्ताव मांडणार

सुरुवातीचा कार्यालयीन अंदाज २१ कोटी ९१ लाख होता. मात्र, वस्तू व सेवाकर, विविध आकार, उपयोगिता सेवा स्थलांतर आणि सल्लागार शुल्क यांचा समावेश केल्यानंतर प्रकल्पाचा सुधारित तपशीलवार अंदाजित खर्च २५ कोटी ७२ लाख ३७ हजार ५३९ रुपये झाला आहे. दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उद्यानात पोलीस गस्त, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक मागणीला केराची टोपली; उद्यान समिती अध्यक्षांचे पत्र दुर्लक्षितच

पुण्यात १९ विदेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य

सरकारची खऱ्या प्रश्नांना बगल - अभिजीत दीपके

कुख्यात दाऊद टोळीच्या गुंडाला दुबईत अटक

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार