मुंबई

आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई महापालिका सज्ज

प्रतिनिधी

वरुणराजाचे आगमन कधीही होऊ शकते. पावसाळ्यात दुर्घटना घडण्याची शक्यता असून आपत्कालीन परिस्थितीत वेळीच मदत पोहोचवता यावी, यासाठी कुठल्या विभागात दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

मान्सून येत्या काही दिवसांतच मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसात येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे. मुंबईत मान्सूनच्या कालावधीत येणाऱ्या अडचणी पाहता या संकटांच्या कालावधीत आधीच तयारी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष मुंबई शहरासाठी मदत करणाऱ्या यंत्रणांसोबत संपूर्ण शहराची रेकी करणार आहेत. एखादी घटना घडल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय उपाययोजना असाव्यात, तसेच यंत्रणांच्या समन्वयासाठी मुंबईत संपूर्ण शहरात ही रेकी करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही रेकी राबवण्यात येणार आहे.

टी-२० विश्वचषकावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

पोलिस शिपाई विशाल पवारांना होतं दारूचं व्यसन; माटुंग्यातील बारमध्ये विकली होती अंगठी ...पोलीस तपासात काय आलं समोर?

भारताच्या दोन्ही रिले संघांना पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट!

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप