मुंबई

न्यू माहीम शाळेची पुनर्बांधणी आहे त्याच जागेवर होणार; बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची स्पष्टोक्ती

न्यू माहीम सेकंडरी शाळेची इमारत अतिधोकादायक स्थितीत असल्याचे कारण देत शाळा पाडण्याचा घाट पालिकेने घातला आहे. पालिकेच्या निर्णयाला स्थानिकांनी, संघटनांनी विरोध केला आहे.

Swapnil S

मुंबई : न्यू माहीम सेकंडरी शाळेची इमारत अतिधोकादायक स्थितीत असल्याचे कारण देत शाळा पाडण्याचा घाट पालिकेने घातला आहे. पालिकेच्या निर्णयाला स्थानिकांनी, संघटनांनी विरोध केला आहे. संघटनाच्या विरोधानंतर पालिका प्रशासनाने यावर स्पष्टोक्ती देत माहीम शाळेची इमारत आहे त्याच ठिकाणी पुनर्बांधणी केली जाणार आहे, असे सांगितले आहे.

पालिका प्रशासनाने न्यू् माहीम शाळेवर बुलडोझर चालवू नये, यासाठी रविवारी काही संघटना एकत्र पालिकेच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला होता.

पालिकेचा दावा काय?

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागातील न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे महानगरपालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षामार्फत संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याात आले. त्यामध्ये ही इमारत सी१ श्रेणीत म्हणजेच अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित करण्याात आली. पालक तसेच लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार न्यू माहीम महानगरपालिका शालेय इमारतीचे त्रयस्थ सल्लागार संस्थांमार्फत देखील संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले. या संरचनात्मक लेखापरीक्षणातदेखील ही इमारत 'अतिधोकादायक' असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लालगार समितीने देखील ही शालेय इमारत अतिधोकादायक असल्याबाबतचे आदेश दिले आहेत.

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

Mumbai : शासकीय कार्यालयांमुळे BMC ला फटका; थकवला तब्बल ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

बीएलए नियुक्तीत उदासीनता! भाजप वगळता अन्य पक्षांत निरुत्साह; मविआसह मनसेची नेमणुकीकडे पाठ

पादचारी सुरक्षेसाठी कृती आराखडा करा; मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिकांना राज्य सरकारचे निर्देश

बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरण: पार्थ पवार, शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांकडून ‘क्लीनचिट’