मुंबई

Mumbai : मध्य मुंबईत गुरुवार, शुक्रवार पाणी नाही

Swapnil S

मुंबई : तानसा (पूर्व) जलवाहिनीच्या दुरुस्तीकामासाठी गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजे १९ तास जी-दक्षिण विभागातील लोअर परळ, करीरोड, प्रभादेवी तसेच जी उत्तर विभागातील दादर, माटुंगा येथे काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  

महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून दुस-या दिवशी म्हणजे शुक्रवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान एकूण १९ तासांसाठी दुरुस्ती काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान जी -दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्‍ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिकीट आरक्षणाच्या नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार लागू

Maharastra Assembly Elections 2024: पक्षांतर्गत बंडाळीच्या धोक्यामुळे महायुती, मविआकडून सावध पवित्रा

नागरिकत्व कायद्यातील अनुच्छेद '६ए' वैध; सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्वाळा