मुंबई

Mumbai : पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद; जैन समाजाची मागणी BMC कडून मान्य

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील काही महानगरपालिकांनी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. ठिकठिकाणी मांसाहार पार्ट्या करत विरोधकांनी याचा निषेध केला होता. आता जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्यूषण काळात दोन दिवस म्हणजेच २४ आणि २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील काही महानगरपालिकांनी मांसविक्रीवर बंदी घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. ठिकठिकाणी मांसाहार पार्ट्या करत विरोधकांनी याचा निषेध केला होता. आता जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्यूषण काळात दोन दिवस म्हणजेच २४ आणि २७ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.

पर्यूषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून कत्तलखाने बंद ठेवण्याबाबतची माहिती मुंबई महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. जैन समाजासाठी पर्यूषणकाळ पवित्र मानला जातो. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीज आणि शेठ भेरूलालजी कन्हैयालालजी कोठारी धार्मिक ट्रस्टने केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी महापालिकेच्या वकिलांनी ही माहिती दिली. पर्यूषण काळात नऊ दिवसांऐवजी एकच दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर आता सुधारित आदेशात पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याचिकाकर्त्यांची ९ दिवस कत्तलखाने बंदची मागणी

पर्यूषण पर्वातील नऊ दिवसांच्या कालावधीत प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देणे, हे जैन धर्माच्या भावनांचे उल्लंघन आहे. तसेच, धर्माच्या हेतूला धक्का पोहोचवणारे आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. तसेच, पर्यूषण पर्वात नऊ दिवस कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्याची मागणी केली गेली. न्यायालयाने मात्र ही मागणी मान्य केली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते. किंबहुना, कत्तलखाने बंद ठेवणे हा धोरणात्मक निर्णयाचा भाग असल्याचे नमूद करून याचिकाकर्त्यांच्या मागणीच्या कायदेशीर वैधतेबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. कोणत्या वैधानिक तरतुदींतर्गत कत्तलखाने नऊ दिवस बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत? अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली होती.

ठाण्यात व्यावसायिक गॅस पुरवठयावर संक्रांत; हॉटेल व्यावसायिक हवालदिल

CET गैरप्रकार रोखण्यास नवे नियम; परीक्षेदरम्यान बोलल्यास होणार शिक्षा; AI टूल्स व डिजिटल साधनांनाही प्रतिबंध

Mumbai : सेंट्रल पार्कच्या खुल्या जागेचे व्यावसायिकीकरण होणार नाही; सरकारचे सभागृहात आश्वासन

Navi Mumbai : खाकी वर्दीच्या स्वप्नाला 'स्टिरॉइड्स'चे गालबोट; मैदानी चाचणीत चार तरुण पोलिसांच्या जाळ्यात!

अजित पवार यांच्या विमान अपघाताला वैमानिकच जबाबदार; CID समोर VSR कंपनीच्या मालकाचा जबाब