PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड 
मुंबई

PM Modi's Mumbai Event: कार्यक्रमस्थळी बनावट PMO अधिकारी; बॉडीगार्ड आणि बंदुकीसह ताब्यात, सुरक्षेतील मोठी त्रुटी उघड

वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तेथे पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. त्याच कार्यक्रमाच्या आवारातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.

Swapnil S

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तेथे पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. त्याच कार्यक्रमाच्या आवारातून मुंबई पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. यातील एका संशयिताकडे बंदूक सापडली, तसेच तो स्वतःला थेट पंतप्रधान कार्यालयाचा वरिष्ठ अधिकारी सांगत असल्याने सुरक्षा यंत्रणा चक्रावून गेली.

मुंबई पोलिसांनी एनएमएसीसी सेंटरमधून रोहन पारेख नावाच्या २४ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले. रोहन पारेख हा एनएमएसीसी परिसरात अत्यंत रुबाबात वावरत होता आणि स्वतःला पीएमओ कार्यालयाचा अधिकारी असल्याचे सांगत होता. मात्र, कार्यक्रमाच्या सुरक्षेवर तैनात असलेल्या विशेष सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी जेव्हा त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून तपासणी केली, तेव्हा त्याने दाखवलेले पंतप्रधान कार्यालयाचे ओळखपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे उघडकीस आले.

बंदुकधारी बॉडीगार्ड

रोहन पारेख हा एकटा नाही तर स्वतःसोबत एका खासगी बॉडीगार्डला घेऊन फिरत होता. त्याच्यासोबत असलेल्या या बॉडीगार्डकडे एक बंदूकही सापडली. मोदींच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि एसपीजी प्रोटोकॉलच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बंदुकधारी व्यक्ती आणि बनावट अधिकारी थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या या सुरक्षेच्या मोठ्या चुकीनंतर मुंबई पोलीस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी रोहन पारेख आणि त्याच्या बंदुकधारी बॉडीगार्डला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे.

ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आता मुंबई पोलीस क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. हा युवक व्हीआयपी परिसरात कशासाठी शिरला होता, त्याचा मूळ हेतू काय होता आणि त्याने बनावट आयडी कार्ड कुठे बनवले, याचा शोध आता क्राईम ब्रांच घेत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

नेपाळमधील प्रलय ही तर २०५० ची नांदी

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे !

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळची सुरुवातच चुकीची होतेय? किडनीवर परिणाम करणाऱ्या 'या' सवयी जाणून घ्या