मुंबई

पॉड टॅक्सीमुळे खासगी वाहनधारकांची संख्या कमी होणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : वांद्रे ते कुर्ला पॉड टॅक्सीचा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, पॉड टॅक्सीमुळे खासगी वाहनधारकांची संख्या कमी होईल व रस्ते वाहतूक कमी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पॉड टॅक्सीसंदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

देशातील हा एकमेव प्रकल्प ठरणार असून त्याला मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावे आणि प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असेही शिंदे यांनी सांगितले. दरम्यान पॉड टॅक्सीसाठी वांद्रे ते कुर्ला या ८ किमी अंतरामध्ये ३३ स्थानके आहेत.

बीकेसीमध्ये पॉड टॅक्सीचा चांगला पर्याय

परिवहन सेवेचे पुढचे पाऊल म्हणून 'पॉड टॅक्सी' असून कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या बीकेसीमध्ये ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. या भागात वर्दळ वाढणार असून या नागरिकांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळण्यासाठी पॉड टॅक्सी चांगला पर्याय ठरेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

आपटा हरवतोय…दसऱ्याचे सोने की नकली पाने? बाजारात कांचनच्या पानांचा सुळसुळाट

राज्यात आता २४ तास शॉपिंग उत्सव; मॉल्स, दुकानांसह सर्व आस्थापने उघडी ठेवण्यास सरकारची परवानगी

‘लाडक्या बहिणीं’साठी वडील, पतीचे ‘आधार’ सक्तीचे; राज्य सरकारचा निर्णय

ठाणे पालिकेचे उपायुक्त ACB च्या जाळ्यात; २५ लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत

Mumbai : गरब्यात अंडी फेकल्याने गोंधळ; मीरारोडमधील घटना, काशीगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल