मुंबई

पोलिसांची कुशल हाताळणी; मुंबईत शांततेत पार पडले मराठा आंदोलन

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात हजारो मराठा बांधवांनी मुंबईत जमाव केला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या कुशल व संयमी हाताळणीमुळे पाच दिवस चाललेले हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर शांततेत पार पडले.

Swapnil S

मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात हजारो मराठा बांधवांनी मुंबईत जमाव केला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या कुशल व संयमी हाताळणीमुळे पाच दिवस चाललेले हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर शांततेत पार पडले.

सीएसएमटी आणि महापालिका मुख्यालयाजवळील आझाद मैदानात आंदोलन झाले. पण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली नाही.

राज्यभरातून आलेले आंदोलक मैदानावर जमले. दक्षिण मुंबईतील चौकांत गर्दी झाल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूककोंडी झाली. अनेक आंदोलक सीएसएमटी स्थानकात जाऊन चटई घालून झोपलेले दिसले.

आंदोलन सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी जरांगे यांच्या कोर टीमशी बैठक घेतली होती. आझाद मैदानात १,५०० पेक्षा जास्त पोलीस तैनात होते, तसेच सीआरपीएफ, सीआयएसएफ, आरएएफ, एसआरपीएफ, दंगल नियंत्रण पथक व महाराष्ट्र सुरक्षा दलाची कुमकीही लावण्यात आली होती.

२९ ऑगस्टला एकदिवसीय आंदोलनास ५,००० जणांची परवानगी दिली होती. पण प्रत्यक्षात ६०,००० हून अधिक जण ८,००० वाहनांतून आले, ज्यामुळे परिसरातील रस्ते बंद झाले. वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी मार्ग बदलावे लागले. सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले गेले.

पाच दिवसांत मंत्रालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मरीन ड्राइव्ह, जहांगीर आर्ट गॅलरी, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया अशा ठिकाणी आंदोलक जमले. पोलिसांनी गर्दी नियंत्रित केली.

सहा पोलिस ठाण्यात नऊ गुन्हे नोंद

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवणे व मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील सहा पोलीस ठाण्यांत आंदोलकांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

आझाद मैदान पोलीस ठाण्यात तीन, मरीन ड्राईव्ह ठाण्यात दोन, माटा रामबाई आंबेडकर मार्ग, डोंगरी, जे. जे. मार्ग आणि कुलाबा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक अशा नऊ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान, हे गुन्हे मागे घेतले जातील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जाहीर केले.

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

"दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..."; अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांची भावूक पोस्ट

Mumbai : उद्यापासून ९ दिवस रंगणार 'काळा घोडा' कला महोत्सव; फ्री पास कसा मिळवाल? जाणून घ्या

भाईंदर उड्डाणपुलाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज; कथित अतिविद्वानांच्या बोलघेवडेपणामुळे दिशाभूल आणि गोंधळ

जिल्हा परिषद निवडणूक : NCP उमेदवाराच्या अर्जाला विरोध करणाऱ्या BJP उमेदवाराला HC चा दणका; एक लाखाचा दंड, याचिकाही फेटाळली