मुंबई

Mumbai : डिजिटल अरेस्टपासून वाचवणार ‘डिजिटल रक्षक’; दोन मोबाईल क्रमांकांद्वारे २४ तास मदत

डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांमधून होणारे लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी डिजिटल रक्षक ही नवी हेल्पलाईन सुरू केली आहे.

Swapnil S

मुंबई : डिजिटल अरेस्टसारख्या गुन्ह्यांमधून होणारे लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी डिजिटल रक्षक ही नवी हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने होणारी फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना ७७१५००४४४४ आणि ७४०००८६६६६ हे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करण्यात आले असून त्यावर कॉल अथवा व्हॉटसअॅपच्या माध्यमातून पोलिसांशी चोवीस तास संपर्क साधता येणार आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून ऑनलाइन नोकरी, शेअर ट्रेडिंग, फिशिंग, क्रेडिट कार्ड, सेक्सटॉर्शन, कर्ज आणि विवाहसंबंधी फसवणूक होत असताना आता डिजिटल अरेस्टचेही गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी हे आपण नामांकित कुरियर कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवत नागरिकांना त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय कुरियर अथवा पार्सल आल्याचे सांगतात. त्या कुरियरमध्ये ड्रग्ज, शस्त्रे, बनावट पासपोर्ट, अवैध सीमकार्ड, हवालाद्वारे आलेली रक्कम असल्याचे सांगून घाबरवतात. त्यानंतर त्यांचेच साथीदार ते पोलीस, आयकर, आयबी, सीबीआय, ईडी आदी विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत अटक करण्याची धमकी देत पैसे पाठवण्यास भाग पाडतात. त्यासाठी बनावट ओळखपत्रे, वॉरंट, समन्स दाखवतात. अशा प्रकरणात वेळीच मदत करण्यासाठी डिजिटल रक्षकचे दोन्ही क्रमांक चोवीस तास कार्यरत राहाणार आहेत.

Mumbai Property Tax : मालमत्ता कराचे बिल आता थेट व्हॉट्सअ‍ॅपवर; BMC ची नवी डिजिटल सेवा लवकरच सुरू

वाशिममध्ये मध्यरात्री भीषण आग! काही मिनिटांत चार दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, VIDEO

Mumbai : सभागृहातील आसन व्यवस्था उत्कृष्ट; तीन वर्षांत एकही तक्रार नाही

गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा; सावंतवाडी रोड स्थानकावर तीन एक्स्प्रेस गाड्यांना थांबा

Mumbai : मध्य रेल्वेला भंगार विक्रीतून १३६.१० कोटींचे उत्पन्न