चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : चणे-फुटाण्याच्या प्रसादात 'ऑरामाईन'चा वापर? कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका; नगरसेवकाचे महापौरांना पत्र

विविध बाजारपेठा, संकुले, मॉल, दुकानात चणे-फुटाण्याचा प्रसाद विकला जातो. मात्र या प्रसादाला आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे...

Swapnil S

मुंबई : विविध बाजारपेठा, संकुले, मॉल, दुकानात चणे-फुटाण्याचा प्रसाद विकला जातो. मात्र या प्रसादाला आकर्षक रंग देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाच्या रासायनिक पावडरचा वापर केला जात असल्याचा आरोप नगरसेवक सचिन बाळकृष्ण पाटील यांनी केला आहे. यामुळे कर्करोग, किडनी निकामी होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने चणे-फुटाण्याच्या प्रसादाची तातडीने तपासणी करून अशा रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेल्या पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी त्यांनी महापौर रितू तावडे यांना केली आहे.

पाटील म्हणाले की, नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही महापालिकेची बंधनकारक जबाबदारी आहे. उत्सवांच्या काळात चणे-फुटाण्याचा प्रसाद विक्रीसाठी ठेवला जातो. या प्रसादाला आकर्षक स्वरूप देण्यासाठी 'ऑरामाईन' नावाची रासायनिक पावडर वापरली जाते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ३७ हजार फेरीवाले 'नॉट रिचेबल'; QR कोड आधारित ओळखपत्रासाठी ३१ ऑगस्ट अखेरची तारीख

जयगड बंदरातील जहाजातून LPG गॅसचा तातडीने उपसा करा; उच्च न्यायालयाचे सरकारी यंत्रणांना आदेश

Mumbai : मोनोरेल सप्टेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता; महालक्ष्मी ट्रॅव्हलेटर स्कायवॉकही खुला होणार

मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर लोकल सेवांवर परिणाम

मुंबईकरांची चिंता मिटली! सातही तलावांमधील जलसाठा ९२ टक्क्यांवर