Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार  
मुंबई

Mumbai : मालमत्ता करासाठी अखेरचे दोन दिवस; सुविधा केंद्र रात्री १२ पर्यंत सुरू राहणार

मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असून सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत थकीत कर भरणा करावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Swapnil S

मुंबई : मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असून सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत थकीत कर भरणा करावा आणि दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. करदात्यांना विहित वेळेत सुलभतेने करभरणा करता यावा, यासाठी ३० व ३१ मार्च रोजी सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे (सीएफसी) सुरू राहणार आहेत.

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात, सहआयुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या नेतृत्वात कर संकलनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

पालिकेच्या https://www.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून करदात्यांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा आहे. यामध्ये, आरटीजीएस, एनईएफटी, गुगल पे, बीबीपीएस, नेटबँकिंग, क्रेडिट नोट तसेच डेबिट व क्रेडिट कार्डद्वारा देयक भरण्याची सोय आहे तसेच, ऑफलाईन पद्धतीने नजीकच्या नागरी सुविधा केंद्रांवर (सीएफसी) करभरणा करता येऊ शकतो.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO