मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरही रविवारी ब्लॉक घेतला आहे. तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील ५व्या आणि ६व्या मार्गिकांवर ब्लॉक असेल, तर ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावरील ब्लॉक
विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गावर सकाळी ८ ते दुपारी १.३० पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायवर्जन करण्यात आले आहे. ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.
चर्चगेट, मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान सर्व धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गांवर चालवल्या जातील.