Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार  (संग्रहित छायाचित्र - FPJ)
मुंबई

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

अंधेरी, मरोळ येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व कायम राहणार आहे.‌

Swapnil S

मुंबई : अंधेरी, मरोळ येथील मुंबई महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व कायम राहणार आहे.‌ ६० वर्षांचा करार करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.‌ त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावावरून सुधार समितीत पडसाद उमटणार असून पालिका प्रशासनाला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.

अंधेरी पूर्व मरोळ येथील सर्वे क्रमांक १५५ भाग, १५६ भाग १६२ भाग ते १६८ धारण करणाऱ्या महापालिकेचा भूभागावरील रुग्णालय सार्वजनिक खासगी-भागीदारी तत्त्वावर महापालिकेच्या ७७०५५ चौरस मीटरपैकी ६६,६८७ चौरस मीटर भूभाग त्यावरील इमारती यांच्यासह सेव्हन हिल्स हॉस्पीटल्स लिमिटेड व सोमा इंटरप्रायझेस या संयुक्त कंपनीला रुग्णालय चालवण्यासाठी दिले आहे. प्रथम ३० वर्षांसाठी आणि नूतनीकरण करता येईल अशाप्रकारे पुढील ३० वर्षांसाठी खासगी सहभाग तत्त्वावर हे रुग्णालय देण्याचा निर्णय २००४ मध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर सेव्हन हिल्स हॉस्पीटल्ससोबत २००५ मध्ये कंत्राट करार आणि सन २०१३ मध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराचे उल्लंघन झाल्यानंतर २४ जानेवारी २०१८ मध्ये करार संपुष्टात आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये ही कंपनी दिवाळीखोरीत गेली. त्यामुळे महापालिकेला दंडात्मक कारवाई करणे शक्य नव्हते. त्यामुळे २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार महापालिकेच्या मान्यतेशिवाय कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे नमूद केले होते. २०२० मध्ये कोविड काळात महापालिकेने हे रुग्णालय कोविडच्या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरात आणले.

१८३ कोटी महापालिकेला अदा

दरम्यान २०२४-२५ मध्ये लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पीपीपी तत्त्वावर हे रुग्णालय देण्यासाठी स्वारस्य अर्ज मागवले. यात ज्युपिटल कंपनी आणि कॅप्री ग्रोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ज्युपिटल कंपनीने महापालिकेचे देणे माफ करण्याची विनंती केली.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी