शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन हस्तांतरणासाठी म्हाडा आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणात सकारात्मक चर्चा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन हस्तांतरणासाठी म्हाडा आणि मुंबई पोर्ट प्राधिकरणात सकारात्मक चर्चा

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होत असतानाच आता शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासालाही गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Swapnil S

मुंबई : वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण होत असतानाच आता शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासालाही गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवडीतील सुमारे २५ हजार २१४ चौरस मीटर जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्याबाबत म्हाडा आणि मुंबई पोर्ट प्राधिकरण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या १२ बीडीडी चाळींमधील ९६० कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाबाबत मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. एम. अंगमुथू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, खासदार मिलिंद देवरा आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शिवडीतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेला आला. पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही यंत्रणांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. या चाळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या अखत्यारीतील जमिनीवर असल्याने जमीन हस्तांतरणाचा प्रश्न कळीचा ठरला आहे. यापूर्वी मुंबई पोर्ट प्राधिकरणाने निश्चित केलेली जमीन हस्तांतरणाची किंमत आणि थकबाकी असल्यास तिचा भरणा केल्यानंतर जमीन सरकारकडे हस्तांतरित करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नव्हती. आता दोन्ही यंत्रणांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता वाढली आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रत्येक फ्लॅटसाठी प्रॉपर्टी कार्ड; राज्यातील सात कोटी फ्लॅटधारकांना मिळणार दिलासा, राज्य सरकारचा प्रस्ताव

हाय फॅट, साखर, मिठाची स्वतंत्र इशारा चिन्हे अनिवार्य; पाकीटबंद खाद्यपदार्थांबाबत सुप्रीम कार्टाचा आदेश

वॉशिंग सेंटर : पाणी वापरावर बंदी; पिण्याचे पाणी न वापरण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव, गृहनिर्माण सोसायट्यांवरही निर्बंधांची शक्यता

कॉफी डे एंटरप्रायझेसच्या व्यवहारांची चौकशी होणार; निधी वळवल्याप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त

Navi Mumbai : तुर्भे रेल्वे उड्डाणपूल चार महिने वाहतुकीसाठी बंद; ३१ मार्चपर्यंत वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग