Mumbai : जखमी रुग्णास शताब्दी रुग्णालयात उपचाराला नकार; नगरसेवकाकडून रुग्णालयाच्या कारभाराची चिरफाड  
मुंबई

Mumbai : जखमी रुग्णास शताब्दी रुग्णालयात उपचाराला नकार; नगरसेवकाकडून रुग्णालयाच्या कारभाराची चिरफाड

मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता याच्यावर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्याऐवजी त्याला खासगी रुग्णालयात घेऊन जा, असा अजब सल्ला रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Swapnil S

मुंबई : मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता याच्यावर कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्याऐवजी त्याला खासगी रुग्णालयात घेऊन जा, असा अजब सल्ला रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता, आरोग्य समिती अध्यक्ष भाजपचे असूनही भाजपच्या नगरसेवकाने शताब्दी रुग्णालयाच्या कारभाराची चिरफाड केली.

मालाड-मार्वे रोड, स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन येथे झालेल्या भीषण बस अपघातात २१ वर्षीय वैभव गुप्ता या तरुणाचा एक पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला, अख्ख्या शरीराला गंभीर जखमा झाल्या. या तरुणाला पुढील वैद्यकीय उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले.

खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला

सकाळी ११.३० वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या या जखमी तरुणाचे नातेवाईक १२.५० पर्यंत केसपेपर बनवण्याच्या रांगेतच थांबवले गेले. दुपारी २ वाजेपर्यंत त्याला आत घेतले… आणि आत घेतल्यानंतर काहीच उपचार करण्यात आले नाहीत. इंजेक्शन नाही, क्ष-किरण नाही, प्लास्टर नाही…, फक्त एक वाक्य- “प्रायव्हेटमध्ये जा!” भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्षांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत चौकशीअंती निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सिंधुदुर्ग-मुंबई विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांना बसने मोपा विमानतळावर हलविले; विमानाचे दोनदा उड्डाण रद्द

दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन - 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेचा शुभारंभ

Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या

BMC शाळांतील विद्यार्थी जाणार सिंगापूरला; वैज्ञानिक क्षेत्रातील अनुभव घेत भरारी घेणार; ३५ विद्यार्थी अन् पाच शिक्षकांचा सहलीत समावेश

मुंबई विमानतळावर ३९.८ कोटींचे ड्रग्ज, सोने जप्त; ९ जणांना अटक