मुंबई

मलेरिया डेंग्यू, कावीळने मुंबई आजारी

नवशक्ती Web Desk

मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लूच्या रुग्ण संख्येत आठवडाभरात १०० ते २०० ने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत साथीच्या आजारांचे टेंशन कायम आहे.

जून महिना कोरडा गेल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा फैलाव कमी होईल, असे वाटत होते; मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. १३ ऑगस्टपर्यंत मलेरिया - ४६२, डेंग्यू - ३१७, लेप्टो - १५१, गॅस्ट्रोचे - ४२९ रुग्णांची नोंद झाली होती; मात्र १५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या सात दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, कावीळ या साथीच्या आजारांमध्ये १०० ते १५० ने वाढ झाली आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवाहन

पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

१ ते २० ऑगस्टपर्यंत आढळलेले रुग्ण

मलेरिया - ७९४

लेप्टो - २२७

डेंग्यू - ४९५

गॅस्ट्रो - ६६०

कावीळ - ४८

स्वाईन फ्लू - १००

चिकनगुनीया - १४

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस