Mumbai Road Accident : सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai Road Accident : सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

सायन-पनवेल महामार्गावर रविवारी दुपारी सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच तो दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Swapnil S

मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर रविवारी दुपारी सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच तो दगावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत दुचाकीस्वाराचे नाव सुनील निद्धू सिंह (वय ५०) अशी झाली आहे. ते माटुंगा पूर्व येथील साई विश्व इमारतीत राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४ च्या सुमारास देवनार बस डेपोसमोर हा अपघात झाला. भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिली. धडकेमुळे तो खाली पडला आणि ट्रकचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी ट्रकचालक राजू कुमार पासवान (वय ३८) याच्याविरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि मोटार वाहन कायद्यानुसार निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडविल्यासह अन्य गुन्ह्यांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोयनेचे पाणी आता मुंबईकडे वळवणार

महाराष्ट्र साहित्य परिषदेत वादंग; नांदी निधीचा हिशेब, घटनाभंग, अविश्वास ठराव कारणीभूत

पुस्तक फाडणे अमान्य; आशिष शेलार यांचा शिंदेसेनेला अप्रत्यक्ष टोला

Mumbai : 'हरितवारी जलतिरी' प्रकल्प अंधारात; सायकल ट्रॅक, पदपथांवरील बत्तीगुल

भाजप, आरएसएस असभ्य - राहुल गांधी