प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

STP प्रकल्पांच्या गतीसाठी तीन शिफ्ट; विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबईतील सात मलजल प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीला गती देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करून कामे तीन शिफ्टमध्ये अखंडित सुरू ठेवावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील सात मलजल प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीला गती देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करून कामे तीन शिफ्टमध्ये अखंडित सुरू ठेवावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. तसेच प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत विहित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत बांगर यांनी विविध प्रकल्पांची प्रगती, अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा केली. बैठकीस मुंबई मलनिस्सारण प्रकल्पाचे प्रमुख अभियंता अशोक मेंगडे यांच्यासह संबंधित अभियंते आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार उपस्थित होते.

मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्या वतीने वरळी (५०० एमएलडी), वांद्रे (३६० एमएलडी), मालाड (४५४ एमएलडी), घाटकोपर (३३७ एमएलडी), धारावी (४१८ एमएलडी), भांडुप (२१५ एमएलडी) आणि वेसावे (१८० एमएलडी) या सात केंद्रांची उभारणी प्रगतिपथावर असून या प्रकल्पांद्वारे दररोज एकूण २,४६४ एमएलडी मलजलावर प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती बांगर यांनी यावेळी दिली.

या परिसरांना लाभ

फोर्ट, भायखळा, पेडर रोड, हाजीअली, दादर, वरळी, माहीम, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, विलेपार्ले, दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, घाटकोपर, मानखुर्द, भांडुप, विक्रोळी, मुलुंड अशा शेकडो परिसरांना या प्रकल्पांमुळे थेट फायदा होणार आहे. तर ,२०० एमएलडी मलजलावर तृतीय प्रक्रिया केली जाणार असून पुढील टप्प्यात संपूर्ण मलजलावर टर्शियरी प्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे. असे बांगर यांनी स्पष्ट केले.

खारक्षेत्रातील बांधकामास अडथळे

मालाड, भांडुप, घाटकोपर आणि वेसावे येथील प्रकल्प खारक्षेत्रात असल्याने बांधकामास अडथळे येत आहेत. मॅंग्रोव्हमुळे परवानग्यांना विलंब होत आहे. तरीही सुमारे ३ हजार मनुष्यबळ प्रतिदिन कार्यरत असून जवळपास ४० टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. धारावी प्रकल्पासाठी जागा मर्यादित असल्याने बहुमजली रचनेत केंद्र उभारले जात आहे. येथील प्रक्रिया केलेले पाणी मिठी नदीत सोडले जाणार आहे. वांद्रे प्रकल्पाच्या परिसरात रूफटॉप गार्डन आणि व्ह्यूइंग टॉवर उभारण्याचाही प्रस्ताव असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

प्रकल्पांसाठी प्रस्तावित कालावधी -

  • घाटकोपर, वेसावे : जुलै २०२६

  • भांडुप : ऑगस्ट २०२७

  • वरळी, वांद्रे, धारावी : जुलै २०२७

  • मालाड : जुलै २०२८

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज