मुंबई

मुंबई : रेल्वे सुरक्षा दलातील उपनिरीक्षकाला ७० हजारांची लाच घेताना अटक

Swapnil S

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईतील रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका उपनिरीक्षकाला ७० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सीबीआयने तक्रारीच्या आधारे आरपीएफ पोलीस स्टेशन, उरण, नवी मुंबई येथे तैनात असलेल्या उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे न्यायालयात सुनावणी प्रलंबित असताना जप्त केलेला ट्रेलर सोडण्याच्या बदल्यात आरोपीने लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. तक्रारीनुसार, न्यायालयाने ट्रेलर सोडण्याचा आदेश दिला तरी लाच दिल्याशिवाय तो सोडला जाणार नाही, अशी आरोपीने तक्रारदाराला धमकी दिली होती.

त्यानुसार सीबीआयने सापळा रचून आरोपीला तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. १६ जुलै रोजी आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यानंतर आरोपीला सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासाचा एक भाग म्हणून, सीबीआयने ठाणे जिल्ह्यातील, कल्याण येथील आरोपींच्या निवासस्थानाची झडती घेतली असून, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था