मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य 
मुंबई

मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईतील जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जलतरण तलावांचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मुंबईतील जलतरण तलावांचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जलतरण तलावांचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमध्ये बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १२,९५,२७४ दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा कमाल पूर्ण पुरवठा पातळी असलेल्या १४,४७,३६३ दशलक्ष लीटरच्या ८९.४९ टक्के इतका आहे.

हवामानाचा आढावा

उपलब्ध पाणीसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करणे आवश्यक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. आगामी पर्जन्यमान, जलाशयांमधील पाणीसाठ्याची स्थिती तसेच हवामानाचा आढावा घेतला जाणार असून त्यानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ

मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

मुंबईत दरडींची टांगती तलवार! ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे अतिधोकादायक

आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही; कराडमध्ये मनोज जरांगे-पाटील यांची गर्जना

मुंबईत नवी सुरुवात करण्याचे स्वप्न भंगले! घाटकोपर दरडीत शेख कुटुंबाचा करुण मृत्यू, चार दिवसांपूर्वीच मुंबईत आलेले कुटुंब उद्ध्वस्त