Mumbai : खर्चासाठी पालिकेचे MMRDA ला पत्र; जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू 
मुंबई

Mumbai : खर्चासाठी पालिकेचे MMRDA ला पत्र; जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या तीन हजार मिमी व्यासाची जलवाहिनी कामाची एमएमआरडीएच्या चाचपणी सुरू असताना फुटली.

Swapnil S

मुंबई : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या तीन हजार मिमी व्यासाची जलवाहिनी कामाची एमएमआरडीएच्या चाचपणी सुरू असताना फुटली. घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून उद्यापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून दुरुस्तीचा खर्च याबाबत एमएमआरडीएला पत्र लिहिणार असल्याचे जल विभागातील धिकाऱ्याने सांगितले.

ठाण्यात तीन हात नाका परिसरात एमएमआरडीएच्या माध्यमातून काम हाती घेण्यात येणार आहे. कामाला सुरुवात करण्याआधी जमिनीखाली काही युटीलिटीज आहे का, याची चाचपणी एमएमआरडीएकडून सुरू होती. त्याच दरम्यान तीन हजार मिमीची जलवाहिनी फुटली. हे कळताच मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक

नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास बंदी; उच्च न्यायालयाचा निर्णय

कुत्र्यांची 'नसबंदी' वेगाने करा! उच्च न्यायालयाचे आदेश