संग्रहित छायाचित्र 
मुंबई

हजारो सेवानिवृत्त कर्मचारी देणीच्या प्रतीक्षेत; नवीन शेड्यूलमुळे कर्मचारी हैराण, बेस्ट कामगार सेनेची बेस्ट भवनावर धडक

ऑक्टोबर २०२३ पासून बेस्ट उपक्रमातील पाच हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम बेस्ट उपक्रमाने अद्याप देऊ केलेली नाही. तसेच कोविड काळात जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडली. मात्र २५ हजार कर्मचाऱ्यांना ७८ कोटींचा कोविड भत्ता देण्यात आलेला नाही.

Swapnil S

मुंबई : ऑक्टोबर २०२३ पासून बेस्ट उपक्रमातील पाच हजार कर्मचारी सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम बेस्ट उपक्रमाने अद्याप देऊ केलेली नाही. तसेच कोविड काळात जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी पार पाडली. मात्र २५ हजार कर्मचाऱ्यांना ७८ कोटींचा कोविड भत्ता देण्यात आलेला नाही. सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युईटी नाही, कोविड भत्ता नाही, यामुळे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न उपस्थित करत सोमवारी शिवसेनाप्रणित ‘बेस्ट’ कामगार सेनेने प्रशासनावर धडक देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.

आर्थिक अडचणीतून जाणाऱ्या ‘बेस्ट’ला पालिकेकडून वारंवार कोट्यवधीची रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात आली आहे. यामध्ये २०१९ पासून आतापर्यंत तब्बल ८०६९.१८ कोटींची रक्कम देण्यात आली आहे. मात्र ‘बेस्ट’चा आर्थिक गाडा रूळावर येणे मुश्कील झाले आहे. प्रशासनाकडून निवृत्त ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांची देणीही रखडवली जात असल्याचा आरोप ‘बेस्ट’ कामगार सेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’ कामगार सेनेचे कार्याध्यक्ष उदयकुमार आंबोणकर, सरचिटणीस रंजन चौधरी यांच्याससह शिष्टमंडळाने ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी डिग्गीकर यांनी सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

राहायला बदलापूरला, ड्युटी गोराईची!

‘बेस्ट’मध्ये कामगारांचे चौमाही महिन्यांचे कामाचे ड्युडी शेड्युल बदलून सोळामाही करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बदलापूर येथे राहणाऱ्या कामगाराला थेट गोराई येथे ड्युटी लावण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे ड्युटी शेड्युलवरील कामगार वर्गात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. याची दखल तातडीने घेत, घराजवळ ड्युटी देण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री