Mumbai : नवे बूट ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी; पाय, कंबरेची दुखणी 
मुंबई

Mumbai : नवे बूट ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी; पाय, कंबरेची दुखणी

वाहतूक पोलिसांना नवीन आरामदायी बूट देण्यात आले आहेत. मात्र, हे बूट त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. नव्या बुटांमुळे पाय आणि कंबरदुखीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या बुटांमुळे अस्वस्थ वाटते. त्याऐवजी आम्हाला स्पोर्ट्स शूज दिले असते तर बरे झाले असते, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

Krantee V. Kale

मेघा कुचिक / मुंबई

वाहतूक पोलिसांना नवीन आरामदायी बूट देण्यात आले आहेत. मात्र, हे बूट त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत. नव्या बुटांमुळे पाय आणि कंबरदुखीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या बुटांमुळे अस्वस्थ वाटते. त्याऐवजी आम्हाला स्पोर्ट्स शूज दिले असते तर बरे झाले असते, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

मुंबई पोलिसांनी जानेवारी महिन्यापासून वाहतूक पोलिसांसाठी उंच घोट्यांचे, सपाट तळाचे सेफ्टी शूज प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. सुरुवातीला हे बूट मरीन ड्राइव्ह आणि डी. बी. मार्ग विभागातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मुंबई पोलिसांची ओळख म्हणून ओळखले जाणारे पारंपरिक टाच असलेले लेदरचे बूट अनेक वर्षांपासून वापरात आहेत. मात्र, या बुटांऐवजी आता त्यांना नवे बूट देण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांना नवे बूट द्यावेत यासाठी अभिनेता अक्षय कुमार यानेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

काय आहेत तक्रारी

प्रत्येक बूट ७०० ग्रॅमपेक्षा जड आहे. सलग अनेक तास उभे राहावे लागत असल्यामुळे या बुटांमध्ये आम्हाला अस्वस्थ वाटते. आम्हाला हलके, आरामदायी बूट हवेत, अशी मागणी पोलिसांनी केली आहे.

असे आहेत नवीन बूट

नवीन पादत्राणांमध्ये काळ्या रंगाचे लेदर अपर, मेटल आयलेट्ससह लेस असलेला पुढील भाग, चांगल्या पकडीसाठी जाड व मजबूत तळ तसेच संरक्षक पॅडिंगसह घोट्याला आधार देणारी रचना आहे. टॅक्टिकल बूट, कॉम्बॅट बूट किंवा पोलीस ड्युटी बूट म्हणून ओळखले जाणारे हे बूट बोटांच्या संरक्षणासह अतिरिक्त कुशनिंग देणारे आहेत.

नवीन बूट सुरक्षित

जुने बूट कडक होते आणि वाहतूक पोलिसांना दररोज जवळपास आठ तास उभे राहावे लागते. नव्या बुटांमध्ये मजबूत बोट संरक्षण आणि अतिरिक्त कुशनिंग देण्यात आले आहे. नवे बूट वापरात आणल्यानंतर त्यांना जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, असे वाहतूक सहआयुक्त अनिल कुंभार यांनी सांगितले.

अनधिकृत ‘बाईक टॅक्सी ॲप्स’वर कारवाईचे आदेश; कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र

Mumbai : अखेर वसई-विरारचा मेट्रो मार्ग झाला मोकळा; MMRDA च्या आयुक्तांकडून प्रकल्प अहवाल सादर

अजित पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून खळबळ; प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना वगळले

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या स्वप्नाला बळ; राज्य सहकारी बँकेकडून १,७४८ कोटींचे अर्थसहाय्य

कल्याणमध्ये विनयभंगप्रकरणी भोंदूबाबा गजाआड