संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई विद्यापीठाकडून प्रतिभावंतांचा गौरव; विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा सन्मान; मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचे वितरण

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य आणि कौशल्य तसेच शैक्षणिक उत्कृष्टतेसह, सह-अभ्यासक्रम उपक्रमांतील सहभाग, कला, क्रीडा आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांमधील सामर्थ्य आणि कौशल्य तसेच शैक्षणिक उत्कृष्टतेसह, सह-अभ्यासक्रम उपक्रमांतील सहभाग, कला, क्रीडा आणि संशोधनाच्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या उत्कृष्टक्षम प्रतिभावंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

शैक्षणिक उत्कृष्टक्षम प्रतिभावंतांना प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्डन बॉय्स आणि गोल्डन गर्ल्स असे पुरस्कार देण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी दीक्षान्त सभागृहात आयोजित गौरव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. भूषण पटवर्धन उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात आणि संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्लॅटिनम पुरस्कारासाठी रुपये १५ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, डायमंड पुरस्कारासाठी रुपये १२ हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि गोल्डन पुरस्कारासाठी रुपये १० हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राचा स्थापना समावेश आहे.

या पुरस्काराअंतर्गत संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ शैक्षणिक विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली. प्रत्येकी रोख रक्कम रुपये १० हजार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्राने विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी : गोल्डन बॉय पुरस्कार

> शिवम संतोष राय, एस. एस. टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उल्हासनगर

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी : डायमंड बॉय पुरस्कार

> तुषार हर्षकुमार शिरसाट, ठाकूर अभियांत्रिकी महाविद्यालय, कांदिवली

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी : प्लॅटिनम बॉय पुरस्कार

> ऋषभ कल्पेश उपाध्याय, साठये महाविद्यालय, विलेपार्ले

संलग्न महाविद्यालये वर्गवारीतून : (विद्यार्थीनी)

सर्वोत्कृष्ट : गोल्डन गर्ल पुरस्कार

> मेघना मंदार करंदीकर, विनायक गणेश वाझे महाविद्यालय, मुलुंड

सर्वोत्कृष्ट : डायमंड गर्ल पुरस्कार

> किशोरी सुनील मोकाशी, एस. एस. टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय, उल्हासनगर

सर्वोत्कृष्ट : प्लॅटिनम गर्ल पुरस्कार

> आयशा इनायत खोत, दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज, दापोली

विद्यापीठ शैक्षणिक विभाग वर्गवारीतून :

सर्वोत्कृष्ट विद्यार्थी : प्लॅटिनम बॉय पुरस्कार

> एकनाथ अंकुश गोपाळ, ग्रंथालय आणि माहिती विज्ञान विभाग, मुंबई विद्यापीठ

सर्वोत्कृष्ट : प्लॅटिनम गर्ल पुरस्कार

> पलक्षी जितेन शाह, अप्लाइड सायकॉलॉजी विभाग आणि समुपदेशन केंद्र, मुंबई विद्यापीठ

संलग्न महाविद्यालये वर्गवारीतून :

कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती > संयोगी राजेंद्र नाईक, श्रीमती इंदिराबाई जी. कुलकर्णी कला महाविद्यालय, जे. बी. सावंत विज्ञान महाविद्यालय, सौ. जानकीबाई धोंडो कुंटे वाणिज्य महाविद्यालय, अलिबाग

विद्यापीठ शैक्षणिक विभाग वर्गवारीतून :

कै. (डॉ.) शर्वरी प्रिया रवींद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती > श्वेता अनिल वराडे, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ व्यवस्थापन, मुंबई विद्यापीठ

विशेष कौतुकाचे मानकरी

> बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत मार्शल आर्ट्समध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी (रौप्य पदक) श्रिया सुविधा मिलिंद साटम यांना गौरविण्यात आले.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी