मुंबई विद्यापीठाचा आता AI वर भर; १७० वा स्थापना दिन साजरा  संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई विद्यापीठाचा आता AI वर भर; १७० वा स्थापना दिन साजरा

मुंबई विद्यापीठाने शनिवारी आपला १७० वा स्थापना दिन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), संशोधन, नवोपक्रम (इनोव्हेशन) आणि उद्योग-भिमुख शिक्षणावर विशेष भर देत उत्साहात साजरा केला.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाने शनिवारी आपला १७० वा स्थापना दिन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय), संशोधन, नवोपक्रम (इनोव्हेशन) आणि उद्योग-भिमुख शिक्षणावर विशेष भर देत उत्साहात साजरा केला.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी उच्च शिक्षण संस्थांना आवाहन केले की, त्यांनी एआयकडे एक आव्हान म्हणून न पाहता एक परिवर्तनाचे माध्यम म्हणून त्याचा स्वीकार करावा. एआय एक नवीन तंत्रज्ञान नसून मानवाच्या भविष्याला आकार देणारी एक क्रांतिकारी शक्ती आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, संशोधन आणि उद्योग जगतात एआयमुळे दूरगामी बदल घडून येतील, असे नमूद करत त्यांनी विद्यापीठांना अध्यापन, शिक्षण आणि संशोधनात सुधारणा करण्यासाठी एआय-आधारित साधनांचा सक्रियपणे वापर करण्याचा सल्ला दिला.

या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी उच्च शिक्षण संस्थांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीही या ऐतिहासिक वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या शुभेच्छा दिल्या. कुलगुरू प्रा. रवींद्र म्हणाले की, ज्ञान निर्मिती, कुलकर्णी विद्यापीठांनी नवोपक्रम आणि सामाजिक परिवर्तनाची केंद्रे बनली पाहिजेत.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

CJP Chalo Sansad March : जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; दिल्लीत कडेकोट बंदोबस्त, Video

CJP Chalo Sansad March : "माझी प्रकृती उत्तम, मला मोर्चात सहभागी होऊ द्या"; सोनम वांगचुक यांचे सफदरजंग रुग्णालयाला पत्र

BEST Bus Accident : अपघातांची मालिका सुरूच! मानखुर्दमध्ये बसची डिव्हायडरला धडक, वाहतुकीवर परिणाम; एकाचा मृत्यू, Video

Mumbai : १०० CCTV, तांत्रिक तपास अन् चार दिवसांची शोधमोहीम; ९ वर्षीय रेवाला धडक देऊन फरार झालेला दुचाकीस्वार अखेर जेरबंद

Wardha : भरधाव आयशर ट्रकची कारला पाठीमागून जोरदार धडक; समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू, Video