(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा २३ ऑक्टोबरपासून

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी २०२४) मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र (हिवाळी २०२४) मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. चारही विद्याशाखाअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा यात समावेश आहे. हिवाळी सत्र २०२४ साठी आयोजित होणाऱ्या या परीक्षांमध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत तृतीय वर्ष बीकॉम, बीकॉम फायनान्शिअल मार्केट, बँकिंग अँड इन्श्युरन्स, अकॉऊन्टींग अँड फायनान्स आणि बीएमएस सत्र ५ च्या परीक्षा या २३ ऑक्टोबरपासून आयोजित केल्या जाणार आहेत.

बीएच्या परीक्षा १३ नोव्हेंबरपासून

तृतीय वर्ष बीए सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहेत. एलएलबी (३ वर्षीय) सत्र ५ आणि एलएलबी (५ वर्षीय) सत्र ९  ची परीक्षा १९ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील तृतीय वर्ष बीएस्सी, बीएस्सी (संगणक शास्त्र), (जैवतंत्रज्ञान), (माहिती तंत्रज्ञान), (फॉरेन्सिक) आणि (डेटा सायन्स) सत्र ५ च्या परीक्षा १३ नोव्हेंबर २०२४ पासून आयोजित केल्या जातील.

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा जाहीर

पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी आणि एमसीए यांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर आगाऊ वेळापत्रक मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आलेल्या परीक्षांच्या वेळापत्रकासोबतच महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे दाखल करावयाच्या अर्जाचा कालावधी आणि परीक्षा शुल्क विनाविलंब भरण्याचा कालावधीही सोबतच्या परिपत्रकानुसार निर्गमित केला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेच्या वेळी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी दिलेल्या कालावधीतच परीक्षा अर्ज आणि शुल्क भरण्याची कार्यवाही करण्यात यावी.

- डॉ. पूजा रौंदळे, संचालिका, परीक्षा व मूल्यमापन मंडळ.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी