Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video 
मुंबई

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

झाडाचा मोठा खांब ट्रेनच्या बाहेर आडव्या स्थितीत बांधलेला दिसत होता, तर काही सदस्य दरवाज्याजवळ उभे राहून त्याचा तोल सांभाळत होते.

Mayuri Gawade

मुंबईत कोळी समाजाने पुन्हा एकदा ब्रिटीशकालीन परंपरा जपली आहे. विरारहून माहीमपर्यंत लोकल ट्रेनने होळीचे झाड आणण्याची ही आगळीवेगळी परंपरा यंदाही उत्साहात पार पडली. यासंदर्भातील एक व्हिडिओ अतुल तांबे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. विरारमधील कोळी बांधवांनी होळीचे झाड खांद्यावर घेत गाणी, ढोल-ताशांचा जल्लोष आणि ‘होळी माते की जय’च्या घोषणा देत रेल्वे स्थानकापर्यंत मिरवणूक काढली. त्यानंतर हे झाड लोकल ट्रेनच्या बाहेरील बाजूस सुरक्षितपणे बांधून महिमकडे प्रवास सुरू झाला.

मोरी रोडशी ऐतिहासिक नाळ

ही परंपरा माहीममधील मोरी रोड परिसराशी जोडलेली आहे. पूर्वी या भागात कोळी समाजाच्या अनेक चाळी होत्या. काळाच्या ओघात पुनर्विकासामुळे चाळींच्या जागी उंच इमारती उभ्या राहिल्या आणि अनेक कुटुंबांनी विरारमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, माहीमशी असलेले त्यांचे सांस्कृतिक आणि भावनिक नाते आजही तितकेच घट्ट आहे.

लोकल ट्रेनमधील जल्लोषमय प्रवास

दरवर्षीप्रमाणे यंदाही विरारहून माहीमकडे होळीचे झाड आणताना ट्रेनमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, झाडाचा मोठा खांब ट्रेनच्या बाहेर आडव्या स्थितीत बांधलेला दिसत होता, तर काही सदस्य दरवाज्याजवळ उभे राहून त्याचा तोल सांभाळत होते. या अनोख्या दृश्यामुळे प्रवाशांचेही लक्ष वेधले गेले.

‘हे आमच्या अभिमानाचं प्रतीक’

समुदायातील एका ज्येष्ठ सदस्याने सांगितले की, ही परंपरा ब्रिटीश काळापासून सुरू आहे. "हे फक्त जाळण्यासाठीचे लाकूड नाही, तर आमचा अभिमान आहे. आम्ही त्याची पूजा करतो आणि सन्मान राखतो,"असे ते म्हणाले.

पाहा व्हिडिओ -

महिममध्ये होलिका दहन विधी

माहीममध्ये पोहोचल्यावर मोरी रोड परिसरात होलिका दहनाचा विधी पार पडतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेत कोळी समाज एकत्र येऊन होळी पेटवतो, धार्मिक विधी करतो आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीचा अभिमान साजरा करतो.

(Disclaimer : या बातमीतील माहिती ही सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट/व्हिडिओवर आधारित आहे. त्यामधील दाव्यांची सत्यता 'नवशक्ति'ने स्वतंत्रपणे पडताळलेली नाही.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग