मुंबई

ऐन उन्हाळ्यात मुंबईच्या काही भागात पाऊस; पुढच्या ३ दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

आज मुंबईसह ठाणे, पुण्यासह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या, हवामान खात्यानुसार पुढचे २४ तास महत्त्वाचे

प्रतिनिधी

आज मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. फक्त मुंबईच नव्हे तर ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावरून आता हवामान खात्याने महत्त्वाची बातमी दिली आहे. हवामान खात्यांच्या माहितीनुसार, राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे असून येत्या काही दिवसांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, हवामान खात्याने गारपीटही होणार असल्याची माहिती दिली.

पुढील ३ दिवसांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा ग्रामीण भागांमध्ये देण्यात आला आहे. तसेच, काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याचे आव्हान हवामान खात्याने केले आहे.

आज सकाळपासूनच मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात काल रात्रीपासून अधुनमधून रिमझिम पाऊस सुरु आहे. तर ठाणे, दिवा,डोंबिवली, कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली होती. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले. तसेच, १५ ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीटी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा उद्या शेवटचा दिवस