मुंबई

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर एईडी मशिन; हृदयरोगाचा झटका येणाऱ्यांवर रेल्वे स्थानकात उपचार

रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्याला हृदयरोगाचा झटका आल्यास आता रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू होणार आहेत.

Swapnil S

मुंबई : धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदय रोगाचे प्रमाण वाढीस लागले आहे. रेल्वे प्रवासादरम्यान एखाद्याला हृदयरोगाचा झटका आल्यास आता रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार सुरू होणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या २० स्थानकांवर ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) मशिन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे हृदयविकाराचा झटका येणाऱ्या प्रवाशांवर तातडीने प्राथमिक उपचार सुरू होणार आहेत. काळाची गरज ओळखून पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल डिव्हिजनने २० रेल्वे स्थानकांवर ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) मशीन उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

स्वयंचलित बाह्य डिफिब्रिलेटर मशीन हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे मशीन चर्चगेट, मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा, विरार, बोईसर आणि वापी स्टेशन या २० स्थानकांवर उपलब्ध होईल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी