Mumbai : पश्चिम उपनगरातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करणार  (संग्रहित छायाचित्र - FPJ)
मुंबई

Mumbai : पश्चिम उपनगरातील रस्ते होणार खड्डेमुक्त; मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करणार

पश्चिम उपनगरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक डांबरचा वापर करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : पश्चिम उपनगरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक डांबरचा वापर करण्यात येणार आहे. पावासाळापूर्व, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम होणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ७ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे.

पश्चिम उपनगरातील झोन-४ अंतर्गत येणाऱ्या के/पश्चिम, पी/दक्षिण आणि पी/उत्तर विभागांतील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक डांबरचा वापर करण्यात येणार आहे. ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसह ६ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या गल्ली व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ३ कोटी ५२ लाख रुपयांची ई-निविदा काढण्यात आली आहे, तर ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे ३ कोटी ८८ लाख रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

मान्सून काळात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही कामे हाती घेण्यात येत आहेत. विशेषतः पश्चिम उपनगरातील अंतर्गत रस्ते आणि मुख्य मार्गांवर मॅस्टिक डांबर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने रस्ते अधिक टिकाऊ राहतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

असे होणार काम

  • ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी - ३.५२ कोटी

  • ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांसाठी - ३.८८ कोटी

  • एकूण अंदाजित खर्च : रु. ७.४० कोटी

  • संबंधित विभाग : के/पश्चिम, पी/दक्षिण, पी/उत्तर

  • कामाचा कालावधी : मान्सूनपूर्व, मान्सूनदरम्यान व मान्सूननंतर

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली