मुंबई

आता स्विमींग पूल, नाट्यगृह, उद्यानांची घरबसल्या माहिती मिळवा; मुंबईकरांसाठी पालिकेची हेल्पलाईन

महानगरपालिकेची विविध नाट्यगृहे, सभागृहे, उद्याने, मैदाने यांच्या आरक्षणाची सद्यस्थिती, शुल्क, आरक्षणाची प्रक्रिया तसेच...

Swapnil S

मुंबई : तरणतलाव, नाट्यगृह, उद्यान, मैदाने आदीची माहिती आता घरबसल्या मिळणार आहे. मुंबई महापालिकेने १८००१२३३०६० हा टोल फ्री नंबर मुंबईकरांसाठी जारी केला आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या हस्ते सोमवारी या हेल्पलाईनचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

१८००१२३३०६० या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क साधून नागरिक पालिकेच्या विविध उपक्रमांबाबत माहिती घेऊ शकतात. यात तरणतलावाच्या सभासद नोंदणीची सद्यस्थिती आणि नोंदणीसाठी करावयाच्या प्रक्रियेची माहिती; वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय येथे भेट देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने काढावयाच्या तिकिटांचे आरक्षण करताना येणाऱ्या समस्यांबद्दल माहिती व निराकरण; महानगरपालिकेची विविध नाट्यगृहे, सभागृहे, उद्याने, मैदाने यांच्या आरक्षणाची सद्यस्थिती, शुल्क, आरक्षणाची प्रक्रिया तसेच माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागासंबंधित माहिती आदींचा समावेश आहे. हेल्पलाईनमध्ये कार्यरत प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना ही माहिती पुरविण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अन्य विभागाची माहिती मिळणार!

या हेल्पलाईनला नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा आढावा घेत आगामी काळात पालिकेच्या अन्य खात्यांशी संबंधित माहिती व मार्गदर्शन या हेल्पलाईनवर उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती समन्वयक (क्रीडा व मनोरंजन) संदीप वैशंपायन यांनी दिली आहे.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर