मुंबई

बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज! सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाचे आगमन

प्रतिनिधी

मुंबई : अवघ्या १६ दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून संपूर्ण मुंबापुरी बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तर शनिवार, २ सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. परळचा महाराजा, कुलाबाचा राजा, बिलीमोराचा चिंतामणी, मुंबईचा युवराज, कोल्हापूरचा सम्राट, मुंबईचा पेशवा आदी गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेशाचे आगमन झाले. तर रविवारी ३ सप्टेंबर रोजी खेतवाडीचा विघ्नहर्ता, मुंबा देवीचा सम्राट, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, फोर्टचा राजा, ताडदेवचा राजा, लव्हलेनचा राजा, मलबार हिलचा राजा, आदी मंडळांच्या मंडपात आगमन होणार आहे.

यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. अनेक मंडळांनी महिनाभरापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. देखावे, सजावट, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईने मंडप सजले आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम आखले आहेत. मंडळे यासाठी कामाला लागली आहेत. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे; मात्र त्या आधीच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होते. गेल्या रविवारपासूनच गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईतील मंडळांनी गणपती बाप्पाला मंडपात वाजत गाजत आणले. रविवारीही ३० हून अधिक गणपती मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

दरम्यान, गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गणपती आगमन ते विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, चौपाट्यांवरील सुविधा आदींचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चौथ्या टप्प्यातील मतदान आज; रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हेंसह २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

देशभरात ९६ मतदारसंघात मतदान

यापुढे निवडणुकीपासून खडसे राहणार दूर; भाजपमध्ये लवकरच प्रवेश

‘आप’ची सरकारे पाडण्याची भाजपची योजना अयशस्वी; अरविंद केजरीवाल यांचा दावा

संदेशखलीतील आरोपींसाठी तृणमूलच्या गुंडांच्या महिलांना धमक्या; पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदींचा आरोप