मुंबई

Mumbai : पालिकेच्या चाव्या कोणाकडे? शिंदे, दरेकर, राजश्री शिरवडकर यांच्या नावाची चर्चा; स्थायी, शिक्षण, सुधार समिती सदस्यांची आज निवड

आज सोमवारी विशेष समिती व वैधानिक समिती सदस्यांच्या नावाची घोषणा पालिका सभागृहात होणार आहे. मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते स्थायी समिती अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार?

Swapnil S

मुंबई : आज सोमवारी विशेष समिती व वैधानिक समिती सदस्यांच्या नावाची घोषणा पालिका सभागृहात होणार आहे. मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते स्थायी समिती अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार. प्रभाकर शिंदे, महापौर पदाची संधी हुकलेल्या राजश्री शिरवडकर आणि आमदार प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे पक्षश्रेष्ठी पालिकेच्या चावी कोणाकडे देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेचा कारभार हा महापालिका आयुक्त ( प्रशासन), महापौर , विविध समित्यांचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून चालतो. महापौर व उपमहापौर नावाची घोषणा झाली असून सदस्य निवड जाहीर करण्यात येणार आहे.

आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित महापालिका सभेत, स्थायी समिति व सुधार समिति ह्यांवर प्रत्येकी २६ सदस्यांची, शिक्षण समितीवर २२ महापालिका सदस्यांची आणि ४ बिगर पालिका सदस्यांची तसेच, 'बेस्ट' समितीवर १६ सदस्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी आयोजित महापालिका सभेत महापौर रितू तावडे या विविध पक्षांच्या गटनेत्यांची घोषणा करतील. तसेच स्थायी समिति, सुधार समिति, शिक्षण समिति व 'बेस्ट' समिति या समित्यांच्या 'अध्यक्ष' पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कार्यक्रम जाहीर करतील.

"विद्यार्थ्यांची माफी मागा"; दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Ashadhi Ekadashi 2026 : विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! दादर–पंढरपूर विशेष रेल्वे, पाहा वेळापत्रक

'जो भुकेला आहे त्याला द्या'; मुंबईतील तरुणाने जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांसाठी झोमॅटोवरून पाठवलं मोफत जेवण; Video

Pune Metro Line 3 : व्हॉट्सॲपवर QR तिकीट, UPI पेमेंटपासून NCMC कार्डपर्यंत; पुणे मेट्रो प्रवाशांसाठी 'या' नव्या सुविधा

"पोलिसांनी संयम दाखवला, अन्यथा..."; दिल्ली आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया