मुंबई

नायगावला चार वर्षांच्या मुलीचा १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू

वसईतील नायगाव येथील नवकार सिटी येथे अनविका प्रजापती ही चार वर्षांची मुलगी खेळता खेळता १२ व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडून मृत पावली.

Swapnil S

मुंबई : वसईतील नायगाव येथील नवकार सिटी येथे अनविका प्रजापती ही चार वर्षांची मुलगी खेळता खेळता १२ व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडून मृत पावली. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या मुलीच्या आईने तिला सँडल घालण्यासाठी शू रॅकवर बसवले. त्यानंतर ती मुलगी खिडकीच्या चौकटीवर बसण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिचा तोल जाऊन ती खाली पडली.

या दुर्घटनेनंतर तिच्या आईने आरडाओरड करून मदत मागितली. त्यानंतर मुलीला आणण्यासाठी शेजारी धावले. त्यांनी मुलीला वसई (पश्चिम) येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास