नालासोपारा येथील एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त; छाप्यात १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त 
मुंबई

नालासोपारा येथील एमडी ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त; छाप्यात १३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

परिमंडळ सहामधील पोलीस अधिकाऱ्यांना ५ ऑक्टोबरला एक इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी टिळक नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी रचलेल्या सापळ्यात त्या इसमाकडे ५७ ग्रॅम मेफेड्रॉंन सापडले.

Swapnil S

मुंबई : नालासोपारा येथील एमडी ड्रग तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा घालून मुंबई पोलिसांनी १३ कोटी ४४ लाखांचे एमडी ड्रग हस्तगत केले. याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

परिमंडळ सहामधील पोलीस अधिकाऱ्यांना ५ ऑक्टोबरला एक इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी टिळक नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी रचलेल्या सापळ्यात त्या इसमाकडे ५७ ग्रॅम मेफेड्रॉंन सापडले. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांची माहिती दिली. त्यांनाही मुंबई आणि मिरा रोड येथून अटक करण्यात आली.

आरोपींनी नालासोपारा येथील पेल्हार गावातील रशीद कंपाऊंडमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती दिली. त्यावरून त्या कारखान्यावर छापा घालून एका आरोपीला अटक करण्यात आली व कारखान्यातून सहा किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी काही आरोपींना पकडण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प