मुंबई

पत्राचाळ प्रकरणी नाव आल्यानंतर शरद पवार यांनी मांडले 'हे' मुद्दे 

पत्राचाळ प्रकरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या बैठकीबाबत विचारण्यात आले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव असल्याचेही पवार यांच्या निदर्शनास आणून दिले

प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्राचाळ मुद्द्यावर मौन सोडले आहे. पत्राचाळ प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करा. ते शक्य तितक्या लवकर करा. आम्ही चौकशी करू नका असे म्हणत नाही. पण इतरांच्या मागे लागू नका, असे आवाहन शरद पवारांनी केले आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्राचाळ प्रकरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या बैठकीबाबत विचारण्यात आले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचे नाव असल्याचेही पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर भाष्य करताना पवार यांनी हे वक्तव्य केले.

पत्राचाळ प्रकरणासंदर्भात यशवंतराव चव्हाण केंद्रात बैठक पार पडली. त्याची मिनिटे आहेत. ते तुमच्याकडे कॉपी करत आहे. त्यावर सचिवांची स्वाक्षरी आहे. त्या बैठकीचे इतिवृत्त तुम्हाला देण्यात आले आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात माझे नाव असल्याचे तुम्ही सांगितले आहे. तपास यंत्रणा न्यायालयात काय म्हणते, यावर राज्य सरकारने त्यावेळी चर्चा केली. पण लवकर चौकशी करा. चार, आठ, दहा दिवसांत लवकरात लवकर चौकशी करा. मात्र हे आरोप वास्तव आणि सत्यावर आधारित नसतील तर त्यावर काय भूमिका घेणार हे जाहीर करा. 

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

BMC Election : शिवसेना-मनसे जागावाटप अंतिम टप्प्यात - संजय राऊत

निवडणुक प्रशिक्षणाला दांडी ठरू शकते महागात; EVM हाताळणीपासून मॉक पोलपर्यंत काटेकोर तयारी

तुळजापुरात भीषण दुर्घटना! विहिरीतील मोटार काढताना शॉक लागला; बाप-लेकासह चौघांचा मृत्यू

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीची सुटका करून लावून दिला विवाह