मुंबई

उद्धव ठाकरेंच्या कोकणातील सभेला स्थानिक लोक गैरहजर; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा

रत्नागिरीच्या खेडमध्ये झालेल्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीका केली

प्रतिनिधी

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेडमध्ये सभा घेतली. या सभेला मोठी गर्दी झाली असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली. यावेळी त्यांनी शिंदे गटासह भाजप आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती. यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठरकेंच्या सभेसाठी स्थानिक लोक गैरहजर होते, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

माध्यमांशी बोलताना भाजप नेते नारायण राणे म्हणाले की, " आधी शिवसेनेच्या सभा या मोठ्या होत होत्या. उद्धव ठाकरेंची सभा 'अरेंज' केलेली होती. सभेचे रूप विराट दाखवण्यासाठी खुर्च्या दूर-दूर लावल्या होत्या. या सभेला स्थानिक लोक नव्हते." असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "जनतेच्या प्रश्नांबद्दल उद्धव ठाकरेंना काय माहिती नाही, त्याला काय बोलता येतं. २.५ वर्ष सत्तेत असताना त्यांनी कोकणाला काय दिले?" असा सवाल नारायण राणेंनी केला. पुढे ते म्हणाले की, "अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना ते मंत्रालयात गेले नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार. ज्यांची मंत्रालयात यायची ताकद नव्हती, ते महाराष्ट्र पिंजून काढणार का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे महाराष्ट्रात फिरले तरी काहीही फरक पडत नाही, उद्धवला सांगा, स्वत: जीभ सांभाळ," अशी टीका त्यांनी केली.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा