मुंबई

एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली,नारायण राणेंचा गंभीर आरोप

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा भाग मंगळवारी प्रसारित झाला.

प्रतिनिधी

'एकनाथ शिंदेंना मारण्याची सुपारी दिली, हा काही पहिला प्रयोग नाही', असा खळबळजनक दावा करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मंगळवारी (ता.२५ जुलै ) गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने उद्धव यांना पोटशूळ उठला असून मी शिवसेना सोडली होती, तेव्हा परदेशी गँगस्टरना सुपारी दिली होती, असा आरोप राणे यांनी केला.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या मुलाखतीचा भाग मंगळवारी प्रसारित झाला. त्याला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. राणे म्हणाले, ‘वृत्तपत्रात वाचले की, एकनाथ शिंदेंना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती. हा काय पहिला प्रयोग नाही. साहेबांनी मोठे केलेल्या कर्तबगार एक एकाला कमी करण्याचे काम यांनी केले. रमेश मोरेची हत्या कुणी केली? जयेंद्र जाधव यांची हत्या कुणी केली? ठाण्याच्या एका नगरसेवकाची हत्या कुणी केली? असे सवाल राणे यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ‘आपण २००५ ला शिवसेना सोडली, तेव्हा देशाबाहेरच्या गँगस्टरला सुपारी दिली. मी समर्थ होतो तोंड द्यायला. मी वाचलो तो माझ्या आई-वडिलांच्या पुण्याईमुळे. ज्यांना सुपाऱ्या दिल्या ते माझ्याशी बोलले की आम्हाला असे असे काम मिळाले आहे. तुम्ही सावध राहा,’ असा दावा राणे यांनी केला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

आता रेल्वे डब्यांमध्ये कॅमेरे बसवणार

उज्ज्वल निकम राज्यसभेसाठी नामनिर्देशित; राष्ट्रपतींनी पाच सदस्यांना केले नियुक्त

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले! छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख भोवला