Navi Mumbai : पाकिस्तानातून दुबईमार्गे टरबुजाच्या बियाण्यांची तस्करी; २.०२ कोटींचा २५ हजार किलोचा साठा जप्त 
नवी मुंबई

पाकिस्तानातून दुबईमार्गे टरबुजाच्या बियाण्यांची तस्करी; २.०२ कोटींचा २५ हजार किलोचा साठा जप्त

पाकिस्तानमधून बियाण्यांच्या टरबुजाच्या आयातीवरील निर्बंध चुकवण्यासाठी दुबईमार्गे भारतात माल आणण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला. 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत न्हावा-शेवा बंदरात कारवाई करून सुमारे २५ हजार किलो बियाण्यांचा, २.०२ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.

Swapnil S

नवी मुंबई : पाकिस्तानमधून बियाण्यांच्या टरबुजाच्या आयातीवरील निर्बंध चुकवण्यासाठी दुबईमार्गे भारतात माल आणण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला. 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट' अंतर्गत न्हावा-शेवा बंदरात कारवाई करून सुमारे २५ हजार किलो बियाण्यांचा, २.०२ कोटी रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

डीआरआयला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आयात मालाची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये हा माल संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) आयात केलेल्या खरबुजाच्या बिया असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात तो टरबुजाच्या बियाण्यांचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. तपासात या बियाण्यांचे मूळ पाकिस्तान असल्याचे उघड झाले.

पाकिस्तानातील कराची बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात आणि तेथून कंटेनर व जहाज बदलून माल भारतात आणण्यात आल्याचे तपासात समोर आले. मालाचे मूळ लपवण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा संशय आहे. भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्ष आयातीवर निर्बंध घातले आहेत. याप्रकरणी आयातदाराचा मुलगा आणि पुतण्या यांना २२ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. यापूर्वी आयात केलेल्या बियाण्यांचीही डीआरआय चौकशी करत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

हुंड्यासाठी पत्नीचा छळ; थार अन् बाईक न दिल्याने केस धरून रस्त्यावर फरफटवलं, लाथाही मारल्या, पतीचं कृत्य CCTV मध्ये कैद

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक