मुंबई

नवाजुद्दीन सिद्दीकीला न्यायालयाचा झटका; भावाविरोधातील मानहानीचा खटला फेटाळला

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल केलेला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

Swapnil S

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याचा भाऊ शमसुद्दीन सिद्दीकी आणि विभक्त पत्नी अंजना किशोर पांडे यांच्याविरुद्ध दाखल केलेला १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला. शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या खात्यांमधील पैशांचा गैरव्यवहार करण्याबरोबर प्रतिष्ठा मलिन केल्याचा आरोप आहे. याच आरोपांवरून नवाजुद्दीनने मानहानीचा खटला दाखल केला होता.

अभिनेता-निर्माता नवाजुद्दीनने २००८ मध्ये शमसुद्दीनला व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले होते. शमसुद्दीनकडे ऑडिटिंग, आयकर रिटर्न भरणे आणि इतर आर्थिक कामांचे व्यवस्थापन करणे यांसारख्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. तसेच शमसुद्दीनकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक पासवर्ड, चेक बुक, ईमेल आयडी आणि इतर महत्त्वाचे कागदपत्रे देण्यात आली होती, असा दावा नवाजुद्दीनने याचिकेत केला होता.

अभिनयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी नवाजुद्दीनने भावाकडे आर्थिक कामांची जबाबदारी सोपवली होती. याच विश्वासाचा शमसुद्दीनने गैरफायदा उठवला आणि आपली फसवणूक केल्याचा आरोप नवाजुद्दीनने केला होता. इतकेच नव्हे तर शमसुद्दीनने नवाजुद्दीनच्या विभक्त पत्नीला खटले दाखल करण्यास प्रवृत्त केले.

अंजनाने लग्नापूर्वी स्वतःला अविवाहित मुस्लिम महिला म्हणून खोटे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु ती तेव्हा विवाहित होती. शमसुद्दीन आणि अंजना या दोघांनी मिळून जवळपास २० कोटी रुपयांचा गैरवापर केला.

दोघांनी माझी सोशल मीडियात प्रचंड बदनामी केली, असा दावा नवाजुद्दीनने केला होता. तथापि, न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांनी नवाजुद्दीनचा दावा मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आणि दावा फेटाळून लावला.

महानगरामध्ये आणखी परवडणारी घरे; उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

विधिमंडळातील आश्वासने ९० दिवसांत होणार पूर्ण; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा विश्वास

जमीन मोजणीचा निपटारा आता 30 दिवसांत! प्रकरणे मार्गी लागणार; खासगी भूमापकाची मोजणी सरकारी अधिकारी करणार

संघासारखी संघटना नागपूर शहरातच राहू शकते; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

सरकारकडून शेती कर्जवसुलीला स्थगिती