मुंबई

दादरला इमारतीला अगदी खेटून नवा पूल, रहिवाशांची नाराजी

दादर पूर्व व पश्चिमेला जोडणारा टिळक पूल हा सर्वाधिक व्यस्त मार्ग आहे. या पुलावरून रोज हजारो वाहने जात असतात. हा पूल ८९ वर्षांचा झाला आहे.

Swapnil S

मुंबई : दादर पूर्व व पश्चिमेला जोडणारा टिळक पूल हा सर्वाधिक व्यस्त मार्ग आहे. या पुलावरून रोज हजारो वाहने जात असतात. हा पूल ८९ वर्षांचा झाला आहे. तसेच वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्याच्या जोडीला दुसरा केबल स्टेड पूल बांधला जात आहे. इमारत व पुलामध्ये केवळ तीन इंच जागा ठेवली आहे. त्यामुळे या इमारतीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वत्र होणाऱ्या टीकेनंतर मुंबई मनपाने काम थांवबले आहे. परवानगी मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू केले जाईल, असे ‘महारेल’कडून सांगण्यात आले.

टिळक पुलाला समांतर केबल स्टेड पूल बांधला जात आहे. ‘महारेल’कडून हा पूल दोन टप्प्यांत बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाला लागूनच असलेल्या नवीन पुलाचे बांधकाम सध्याच्या वाहतुकीला अडथळा न होता पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर वाहतूक नवीन पुलाकडे वळवून जुना पूल पाडला जाईल. दुसऱ्या टप्प्यात केबल स्टेड पुलाच्या दुसऱ्या बाजूची पुनर्बांधणी केली जाईल. केबल स्टेड पुलाच्या प्रत्येक भागाची एकूण लांबी ६६३ मीटर आणि प्रत्येक भागाची रुंदी १६.७ मीटर आहे. मात्र हे काम करताना पुलाचे खांब ८९ वर्षे जुन्या विष्णुनिवास इमारतीला खेटून बांधले आहे. त्यामुळे भविष्यात इमारतीच्या पुनर्विकासाच्या वेळी अडचण होईल, असे या इमारतीच्या मालकाने सांगितले.

दादर टिळक पुलाचे काम विनावाहतुकीला अडथळा निर्माण करता सुरू आहे. काम करताना पूल बंद केला तर वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होईल. टिळक पुलाचे काम पालिकेने आखून दिलेल्या नियमानुसार होत आहे. इमारतीजवळ स्पॅन आल्याने इमारतीला काही धोका होईल का, याबाबत पालिका लवकरच माहिती उपलब्ध करणार आहे. सध्या या पुलाचे काम थांबवण्यात आले असून पालिकेच्या परवानगीनंतर पुढील काम सुरू होईल, असे महारेलकडून सांगण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी