मुंबई

नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार ५ जुलैला होणार ?अर्थ आणि गृह खाते फडणवीसांना मिळणार

वृत्तसंस्था

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तसेच भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला. त्यानंतर आता मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५ जुलै म्हणजेच मंगळवारी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात असून बंडखोर नेत्यांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला ४० जणांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी आधीपासूनच फिल्डिंग लावली आहे. मंत्रिमंडळात राहणार नाही, अशी घोषणा केल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार फडणवीस यांनी नाराज होऊनच उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी अर्थ आणि गृह मंत्रालय अशी दोन महत्त्वाची खाती ते आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदारांपैकी १२ जणांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते तर भाजपच्या कोट्यातून २४ जण मंत्री होऊ शकतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाण्याची शक्यता आहे. दादा भुसे यांच्याकडे कृषि तर उदय सामंत यांच्याकडे शिक्षण खाते कायम ठेवण्यात येणार असून दीपक केसरकर यांना चांगले खाते दिले जाण्याची शक्यता आहे. नव्या सरकारमध्ये बच्चू कडू, शंभुराज देसाई आणि अब्दुल सत्तार यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असून त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, विजयकुमार देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी पाटील निलंगेकर, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, डॉ. अशोक उईके, सुरेश खाडे, जयकुमार रावल, अतुल सावे, देवयानी फरांदे, रणधीर सावरकर आणि माधुरी मिसाळ यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. तर याव्यतिरिक्त जयकुमार गोरे, प्रसाद लाड, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, राहुल कुल आणि गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यातही राज्यमंत्रिपदाची माळ पडू शकते.

चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात नसतील

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे नव्या सरकारमध्ये मंत्रिमंडळात सहभागी होणार नाहीत, अशी माहिती भाजपच्या सूत्रांकडून समजते. त्याचबरोबर या मंत्रिमंडळात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही स्थान देण्यात येणार नसल्याचे समजते. पंकजा या कोणत्याही सभागृहाच्या सदस्या नाहीत तसेच त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत असून मध्य प्रदेशच्या सहप्रभारी आहेत.

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड