मुंबई

वरळी कोळीवाड्याचा नवा लूक सी लिंकवरून न्याहाळता येणार

रंगरंगोटी, सौदयकरण, आकर्षक विद्युत रोषणाई कोळीवाडा झोपडपट्टी उजळून निघणार आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : वरळी सी लिंकवरून प्रवास करताना आता वरळी कोळीवाड्याचा नवा लूक न्याहाळता येणार आहे. रंगरंगोटी, सौदयकरण, आकर्षक विद्युत रोषणाई कोळीवाडा झोपडपट्टी उजळून निघणार आहे.

वरळी किल्ल्याच्या जिर्णोध्दार व सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, भविष्यात या किल्ल्यावर पर्यटकांची संख्या वाढू शकतो. या किल्ल्या शेजारीच वरळी कोळीवाडा असून, जवळून वांद्रे-वरळी सी लिंक मार्गाशेजारीच कोळीवाडा असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मुंबईकर जनता तसेच भारतातील पर्यटकांसह परदेशी पर्यटक प्रवास करत असल्याने वरळी कोळीवाडा परिसरातील या झोपड्यांमुळे बकालपणा दृष्टीस पडत असतो. एकाबाजुला मुंबईचे सौंदर्यीकरण करताना रस्ते,पदपथ तसेच सर्व विभाग सुशोभित केले जात असताना दुसरीकडे मुंबई शहरात प्रवेश करताना पर्यटकांच्या दृष्टीस हा बकालपणा पडत असल्याने महापालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाअंतर्गत येथील झोपड्यांच्या भिंतीसह छतांची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पावणे दोन कोटींचा खर्च

महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून, यासाठी विविध करांसह तब्बल पावणे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामांसाठी एन.के.शहा इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये या रंगरंगोटीचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीची उद्या घोषणा होणार? संजय राऊत यांच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण

बांगलादेशातील हिंदू कामगाराच्या हत्येचा दिल्लीत निषेध; पोलिस-आंदोलकांमध्ये संघर्ष

निवडणुकांच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचा भाजपला इशारा; "महायुतीतील मित्रपक्षांवर...

Thane Election : जागावाटपावरून घमासान सुरूच! भाजपची स्वबळाची चाचपणी; भाजप-सेना बैठक झालीच नाही