अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण : वाझे, प्रदीप शर्मांवर आरोप निश्चित संग्रहित छायाचित्र
मुंबई

अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण : वाझे, प्रदीप शर्मांवर आरोप निश्चित

मुंबई येथील विशेष एनआयए न्यायालयाने शनिवारी २०२१ मधील अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर आठ आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले. आता त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्यासाठी 'भारतीय दंड संहिता' तसेच 'बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्या'च्या संबंधित कलमांखाली खटला चालवला जाईल.

Swapnil S

मुंबई येथील विशेष एनआयए न्यायालयाने शनिवारी २०२१ मधील अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा आणि इतर आठ आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केले. आता त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्यासाठी 'भारतीय दंड संहिता' तसेच 'बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्या'च्या संबंधित कलमांखाली खटला चालवला जाईल. 'एनआयए' न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोपींनी स्वतःला निर्दोष घोषित केल्यानंतर हे आरोप निश्चित केले.

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी स्फोटकांनी भरलेली एक एसयूव्ही सापडली होती. ही एसयूव्ही आपल्याकडून चोरीला गेल्याचा दावा करणारे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च २०२१ रोजी ठाण्यातील खाडीत आढळला होता.

या प्रकरणात काही दिवसांनंतर वाझे यांना अटक करण्यात आली होती. एनआयएच्या मते, अंबानी यांच्या घराबाहेर एसयूव्ही उभी करण्यात त्यांचा सहभाग होता. एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीने कथितपणे दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या मासिक वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये घबराट पसरवून खंडणी वसूल करणे हा यामागील हेतू होता. याशिवाय, आपले गमावलेले वर्चस्व आणि 'सुपर कॉप' ची प्रतिमा पुन्हा मिळवणे हाही या माजी 'एंकाउंटर स्पेशलिस्ट' पोलीस अधिकाऱ्याचा उद्देश होता, असे म्हटले आहे.

एनआयएने पुढे दावा केला की, मनसुख हिरेन यांनी स्फोटकांचे खापर स्वतःवर घेण्यास नकार दिल्याने आणि ते संपूर्ण कटाचा पर्दाफाश करू शकणारा एक 'कमकुवत दुवा' ठरत असल्याने, वाझे यांनी पुढे हिरेन यांची हत्या करण्याचा कट रचला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली