मेटा आणि गुगलविरुद्ध गडकरींचा ११ कोटींचा दावा 
मुंबई

Mumbai : मेटा आणि गुगलविरुद्ध गडकरींचा ११ कोटींचा दावा

इथेनॉल मिश्रित ई-२० इंधन धोरणाची संबंधित कथित बदनामीकारक व डीपफेक मजकुरामुळे देशात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटा व गुगलविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ११ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : इथेनॉल मिश्रित ई-२० इंधन धोरणाची संबंधित कथित बदनामीकारक व डीपफेक मजकुरामुळे देशात आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटा व गुगलविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ११ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दिवाणी दावा दाखल केला आहे. हा बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश देण्याची मागणी या याचिकेत केली आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी या याचिकेची दखल घेत सुनावणी ५ ऑगस्टला निश्चित केली आहे. कालच सोमवारी 27 जुलै रोजी उच्च न्यायालयाने गडकरी यांना हा दावा दाखल करण्यास परवानगी दिली होती.

अज्ञान व्यक्तींनी पसरवलेल्या या बदनामीकारक मजकुरात ई २० इंधन या संदर्भात गडकरी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार असल्याचे चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार