मुंबई

बेकायदा बॅनर्स, फलक प्रिंट करणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा

सोमवारी कुर्ला एल. वॉर्डात ७ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Swapnil S

मुंबई : बेकायदा बोर्ड, बॅनर्स, फलक प्रिंट करून देणाऱ्या व्यावसायिकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. कुर्ल्यातील ७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या लायसन्स विभागाकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ‘स्वच्छ मुंबई’ अभियानांतर्गत मुंबईतील पदपथावर बेकायदा कब्जा करणारे, अतिक्रमण, रस्त्यांच्या दुतर्फा बेकायदा वाहने जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच बेकायदा फेरीवाले, अतिक्रमण याविरोधात कारवाईला वेग दिला आहे. तर बेकायदा फलक, पोस्टर्स, बॅनर्स प्रिंट करून देणाऱ्या व्यावसायिकांना थेट नोटीस बजावा, असे सक्त आदेश पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिले आहेत. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशानंतर पालिकेच्या लायसन्स विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यात पालिकेच्या वॉर्डात पोस्टर्स, बॅनर्स, फलक लावले आहेत त्याठिकाणी झाडाझडती घेत संबंधित व्यावसायिकांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. यात सोमवारी कुर्ला एल. वॉर्डात ७ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता