मुंबई

आता सुरक्षित घर खरेदी करणे शक्य; महारेराकडून घर खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

बहुतेकजण आयुष्यभराची कमाई घालून घर घेत असतात. या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने घर खरेदीदारांना कायदेशीररीत्या सक्षम करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत.

Swapnil S

मुंबई : बहुतेकजण आयुष्यभराची कमाई घालून घर घेत असतात. या गुंतवणुकीत फसवणूक होऊ नये म्हणून महारेराने घर खरेदीदारांना कायदेशीररीत्या सक्षम करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत. आता महारेराने घर खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार ग्राहकांनी पुरेपूर काळजी घेतल्यास सुरक्षित व संरक्षित गुंतवणूक करणे शक्य होणार आहे.

महारेराने नवीन गृहनिर्माण प्रकल्पाची नोंदणी करताना हा सर्व तपशील, पूरक कागदपत्रांसह देणे बंधनकारक केले आहे. याशिवाय घर खरेदीदार आणि प्रवर्तक यांच्यातील घर विक्री करार आणि घर नोंदणी केल्याचे पत्र हे महारेराने प्रामाणिकृत केलेल्या मसुद्यानुसारच द्यावे, असे बंधन प्रवर्तकांवर घातलेले आहे. घर खरेदी करारात दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोष दयित्व कालावधी आणि हस्तांतरण करार या बाबी अपरिवर्तनीय राहतील. त्यात बदल करता येणार नाही. नोंदणी पत्र  देताना सदनिका क्रमांक, चटई क्षेत्र, प्रकल्प पूर्णत्वाचा अपेक्षित दिनांक याचा तपशील नोंदवणे यात बंधनकारक करण्यात आलेला आहे. एवढेच नाही प्रवर्तकाने घर खरेदीकरारात आणि नोंदणीपत्रात स्वतंत्र जोडपत्रात पार्किंग आणि आश्वासित सोयी सुविधांचा समग्र तपशील देणेही बंधनकारक केलेले आहे. शिवाय या पार्किंगची लांबी, रूंदी, उंची, प्रकल्पस्थळी पार्किंगची प्रत्यक्ष जागा हेही या जोडपत्रात नोंदवणे आवश्यक आहे. प्रकल्पात आश्वासित केलेल्या विविध सोयी, सुविधा कधी उपलब्ध होणार,  सोसायटीला कधी हस्तांतरित होणार हेही या जोडपत्रात नमूद करणे गरजेचे आहे.

याशिवाय एकूण रकमेपैकी १० टक्क्यांपर्यंत रक्कम देऊन घरखरेदी घर नोंदणी करीत असल्यास प्रवर्तकाला घर विक्रीकरार करणे बंधनकारक आहे. याबाबत ग्राहकांना महारेराकडे तक्रार नोंदवता येते.

भविष्यात उपस्थित होणाऱ्या अनेक शक्यतांबद्दल काळजी घेऊन महारेराने अनेक बाबी प्रवर्तकांना बंधनकारक केलेल्या आहेत. घरखरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे घर नोंदणीपूर्वी नियमांची छाननी करून विकासकाकडे त्याबाबत आग्रह धरणे गरजेचे आहे.

घर घेताना हे तपासा

- महारेरा नोंदणीकृत प्रकल्पाशिवाय संबंधित प्रकल्पावरील कज्जे दलालीची प्रकरणे

- टायटल क्लियरन्स रिपोर्ट

- स्थानिक प्राधिकरणाकडून दिला जाणारा प्रकल्प मंजुरीचा आराखडा

- मजल्याची परवानगी स्पष्ट करणारे प्रारंभ प्रमाणपत्र

- विक्रीकरार आणि घर नोंदणीपत्र

- पार्किंग व सेवासुविधांच्या निर्धारित तपशील

- महारेराच्या संकेतस्थळावर प्रकल्प पूर्णतेची तारीख आवश्यक

- महारेराने ठरवून दिलेल्या "आदर्श घर खरेदी करारानुसारच" करार

- महारेराकडे नोंदणीकृत मध्यस्थामार्फतच जागेचा व्यवहार

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री